संत गाडगे बाबा यांना भारतरत्न पुरस्कार द्या-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे।

😊 Please Share This News 😊
|

नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक 23/2/2025 रविवार रोजी राष्ट्र संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्ताने नाशिक शालिमार येथील पुतळ्यास भीम टोला सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले..याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना राज्य व केंद्र सरकारकडे संत गाडगेबाबा तसेच महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली..यावेळी गांगुर्डे यांनी माहिती देताना सांगितले की राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा जन्म शेंडगाव ता.दर्यापूर जिल्हा अमरावती येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला त्यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक होते त्यांनी स्वच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती विसाव्या शतकातील समाज सुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी महत्त्वाचे नाव संत गाडगेबाबा यांचे आहे असे गांगुर्डे म्हणाले..
याप्रसंगी भीम टोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, प्रदेशाध्यक्ष विकी बाबा भोळे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर,शहराध्यक्ष सुरेशजी जाधव, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |
More Stories
